तुमचा तुमच्या विचारांवर ताबा आहे का? तुमचं मन शांत आहे का? जर स्ट्रेस / तणाव आलाच तर तो तुम्ही दहा-पंधरा मिनिटात घालवू शकता का? तुम्ही भूतकाळाकडं त्रयस्थपणे बघू शकता का? भविष्याची चिंता न वाटता भविष्याकडे आशेने आणि उत्साहाने तुम्ही बघू शकता का? यातील बऱ्याच प्रश्नांची आपली उत्तरे नाही अशी असतात. त्या नाही ला, हो मध्ये बदलण्यासाठी हा कोर्स आहे.
विचार करण्याची क्षमता हे खरे तर मानवाला मिळेल वरदान आहे, परंतु नकळत अति विचार करण्याच्या लागलेल्या सवयी मुळे हा शाप आहे कि काय असे कुठेतरी वाटू लागले आहे. पण मनाची एक चांगली बाजू सुद्धा आहे. आपण आपल्या मनाला योग्य approach वापरून पाहिजे तसे ट्रेन पण करू शकतो. त्यामुळे जर आति विचार करायला मन नकळत ट्रेन झाले असेल तर त्याला विचार कमी करायला आणि टेन्शन घालवायला सुद्धा ट्रेन करू शकतो.
आयुष्यात चॅलेंजेस येतच राहणार पण त्यामुळे होणार त्रास हा मात्र ऑपशनल असतो. आपल्या मनाची क्षमता आफाट आहे पण मनाचा योग्य वापर करायला न शिकल्यामुळे आपण विनाकारण त्रास करून घेतो. बोलून मनाला बदलता येत असते तर आयुष्य खूप सोपे झाले असते. भूतकाळाचा विचार करू नकोस, भविष्यकाळ उज्वल आहे आणि आजचा दिवस मजेत घालव, एवढ्या तीन वाक्यात काम झाले असते. पण तसे होत नाही. मनाला प्रोग्रॅम करायला वेगळ्या systems आणि techniques वापरावे लागतात, आणि त्यासाठीच हा कोर्स